मुंबई : गेल्या काही दिवसांत नवीन संसदेच्या इमारतीवरील सेंट्रल विस्टा प्रकल्पा अंतर्गत उभारल्या गेलेल्या अशोक स्तंभावरून वाद पेटला आहे.अनेक राजकीय नेत्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर आता ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या विरोधकांवरच निशाणा साधला आहे.
दरम्यान या नवीन अशोक स्तंभाच्या अनावरणावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टोकाचे आरोप केले आहेत. केंद्र सरकारने जाणूनबुजून अशोक चक्रावर सिंहांना हिंसक दाखवत राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी या वादग्रस्त मुद्यावर प्रशांत भूषण यांचे ट्विट शेअर करत लिहिले आहे की, शहरी नक्षलवाद्यांना दात नसलेला सिंह हवा आहे वाटतं, म्हणजे ते यांना पाळीव प्राण्यासारखे वापरू शकतील.
एका दुस-या ट्विटमध्ये विवेक यांनी पुन्हा विरोधकांवर शाब्दिक फैरी झाडत लिहिले आहे की, सेंट्रल विस्टा अंतर्गत उभारलेल्या नव्या राष्ट्रीय प्रतीकाने हे सिद्ध केले आहे की शहरी नक्षलवाद्यांना केवळ अँगल बदलून मूर्ख बनवले जाऊ शकते.