22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमनोरंजनसुशांत प्रकरणी संयम बाळगा; मुंबई उच्च न्यायालयाने माध्यमांना फटकारले

सुशांत प्रकरणी संयम बाळगा; मुंबई उच्च न्यायालयाने माध्यमांना फटकारले

एकमत ऑनलाईन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवली. त्यानंतर नवनवी माहिती समोर येत आहे. दरम्यान, ८ माजी आयपीएएस अधिका-यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुशांतसिंह प्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने माध्यमांना संयम ठेवण्यास सांगितले.

सुशांतसिंह प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी ८ माजी आयपीएस अधिका-यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. सुशांतसिंह प्रकरणी वार्तांकन करताना माध्यमांनी संयम ठेवावा. तसेच तपासावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही, अशा प्रकारे वार्तांकन करावे, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले.

राज्यातील माजी डीजीपी एम. एन. सिंग, पी.एस. पसरिचा, डी. के. सिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथूर, के. सुब्रमण्यम, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डी. एन. जाधव आणि माजी अतिरिक्त डीजीपी के. पी. रघुवंशी यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास नैतिकदृष्ट्या, निष्पक्षपणे आणि वस्तुनिष्ठ केला जावा. तसेच वार्तांकन हे पोलिस किंवा अन्य लोकांच्या विरोधात मोहिमेसारखे बदलू नये, असे याचिकाकर्त्यांनी नमूद केले होते.

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या