23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमनोरंजनशिल्पा शेट्टीसह आईच्या अडचणीतदेखील वाढ

शिल्पा शेट्टीसह आईच्या अडचणीतदेखील वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान, या कारवाईत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची काही बँक खातीदेखील सील करण्यात आली आहेत. दरम्यान, फसवणुकीच्या प्रकरणावरून शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

राज कुंद्रा अटकेत असतानाच आता शिल्पा शेट्टीच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर आयोसिस वेलनेस सेंटरच्या नावावर अनेक लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लखनौमधील हसरतगंज पोलिस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता लखनौ पोलिसांची टीम या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे. लखनौमधील जोस्तना चौहान आणि रोहित वीर सिंह यांनी शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या चौकशीत शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात पुरावे हाती लागल्यास शिल्पा शेट्टीला आईसह अटक होण्याची शक्यता आहे.

शिल्पा शेट्टी व आईलाही नोटीस
शिल्पा आयोसिस वेलनेस सेंटर नावाची एक फिटनेस चेन चालवते. या कंपनीची ती चेअरमन असून तिची आई सुनंदा या कंपनीच्या डायरेक्टर आहेत. या फिटनेस चेनच्या ब्रॅन्चसाठी शिल्पा आणि तिच्या आईने अनेकांकडून कोट्यवधी रुपये घेतले. मात्र नंतर पाठ फिरवली, असे शिल्पा आणि सुनंदा शेट्टी यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी आता शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला नोटीस बजावण्यात आली.

भेटा परिसरातील नदी-नाले कोरडेठाक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या