24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमनोरंजनप्रेग्नन्सीसाठी वाढते वय धोकादायक : सोनम कपूर

प्रेग्नन्सीसाठी वाढते वय धोकादायक : सोनम कपूर

एकमत ऑनलाईन

लंडन : सोनमच्या घरी २० ऑगस्टला नव्या पाहुण्याचे आगमन झाले. सोनमचा पती आनंद अहुजा आणि परिवाराने त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. सोनम आणि तिचा मुलगा आता दोघेही सुखरूप आहेत. मात्र त्याला जन्म देताना आपल्याला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागल्याचे तिने म्हटले आहे. तिने एका मुलाखतीमध्ये या सगळ्या गोष्टींविषयी सांगितले होते. सोनम कपूरने काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध फोटो मॅग्झिनसाठी फोटोशूट केले.

त्याला तिच्या चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला. सोनम म्हणते, मला प्रेग्नन्सीच्या वेळी अनेक कॉम्प्लिकेशनचा सामना करावा लागला. त्यावेळी मी लंडनमध्ये होते. त्याठिकाणी कोरोनाचे वातावरण होते. परिस्थिती चिंताजनक होती. काही दिवसांनी परिस्थिती सुधारली. मी आणि आनंदनी मिळून विचार केला. बाळाला जन्म द्यायचा. आपण दिसायला तरुण दिसतो मात्र तुमचे शरीर प्रेग्नन्सीसाठी पूरक असावे लागते. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. मला बाळाला वाचविण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन्स घ्यावी लागली होती. वाढते वय मला खूप वेदना देणारे होते. अनेक इंजेक्शन्स घेतल्याने मला आणखी त्रासाला सामोरे जावे लागले. पण बाळाला सुखरूप जन्म देण्यासाठी हे गरजेचे होते असे सोनमने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या