मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने नुकतेच स्त्री-पुरुष मानधनाच्या आकड्यातील समानता आणि आपल्या वैयक्तिक अनुभवाविषयी बोलताना खुलासा केला आहे की ती काही अशा पुरुषांना ओळखते ज्यांच्या मनात तिच्या यशाने असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास करत यशाच्या शिखरावर पोहोचलेली प्रियंका चोप्रा सध्या खूप चर्चेत असलेली पहायला मिळते. काही दिवसांपूर्वी प्रियंकाने बॉलिवूडमधील राजकारणावर हैराण करणारे खुलासे केले होते.
अर्थात यावेळी प्रियंकाने हे देखील आवर्जून नमूद केले की, ती काही अशा पुरुषांना देखील ओळखते जे तिच्या यशाने खुश आहेत. प्रियंका चोप्रा म्हणाली, माझ्या आयुष्यात खूप चांगले पुरुष आहेत ज्यांना माझ्या यशाने आनंद होतो ना की असुरक्षित वाटते. पण माझ्या आयुष्यात काही असे पुरुष देखील आले आहेत ज्यांना माझ्या यशाने असुरक्षित वाटायचे आणि अजूनही वाटते.
म्हणून मला वाटते की, पुरुषांनी स्वातंत्र्य पुरेपूर एन्जॉय केले आहे आणि कुटुंबाचे प्रमुख असल्याकारणाने प्रतिष्ठेचा देखील आनंद अनुभवला आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रतिष्ठेला तेव्हा धक्का पोहोचतो जेव्हा एखादी महिला त्या जागेवर येते किंवा एखादी महिला त्यांच्यापेक्षा अधिक यशस्वी होते. किंवा एखादा पुरुष घरी राहतो आणि घरातील महिला कामासाठी बाहेर पडते तेव्हा पुरुषी अहंकाराला ठेच पोहोचते.