30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home मनोरंजन पुण्यात ४ ते ११ मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

पुण्यात ४ ते ११ मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

एकमत ऑनलाईन

पुणे : पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या ४ ते ११ मार्च दरम्यान होणार आहे. महोत्सवाचे हे सलग १९वे वर्ष आहे. चित्रपटगृहाबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून महोत्सव सिनेरसिकांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती पुणे फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

राज्याच्या इतर शहरांमध्ये देखील चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यंदा मुंबई व नागपूरबरोबर लातूर येथे देखील चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले. या महोत्सवासाठी यावर्षी ९३ देशांमधून तब्बल १६११ चित्रपट प्राप्त झाले आहेत. विविध विभागातील तब्बल १८० चित्रपटांचा आस्वाद सिनेरसिकांना महोत्सवा दरम्यान घेता येणार आहे. चित्रपट निवड समितीच्या माध्यमातून या चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे.

फ्रंटलाईन वॉरियर्स ला महोत्सव समर्पित
ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून यावर्षीचा महोत्सव होणार असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर महोत्सवावेळी असणा-या सर्व सरकारी नियमांचे पालन करत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोविड काळात अग्रस्थानी असलेल्या फ्रंटलाईन वॉरियर्स ला आम्ही यावर्षी हा महोत्सव समर्पित करीत आहोत.

२१०० कोंबड्यांना दयामरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या