26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजननोरा फतेहीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

नोरा फतेहीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

एकमत ऑनलाईन

मुंबई : सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्री रडारवर असून अनेक अभिनेत्रींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. काल (शुक्रवारी) अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नोराची चौकशी करण्यात आली. एक नाही, दोन नाही, तर तब्बल सहा तास नोरा फतेहीची चौकशी सुरु होती. दरम्यान, यापूर्वी याप्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचीही चौकशी करण्यात आली होती.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीला काल (शुक्रवारी) चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. काल सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नोराची याप्रकरणी चौकशी सुरु होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी नोराचा जबाब नोंदवून घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज पडल्यास नोरा फतेहीला पुन्हा एकदा चौकशीला बोलावले जाऊ शकते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या