27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनसलमानसाठी आयपीएस नांगरे पाटील मैदानात

सलमानसाठी आयपीएस नांगरे पाटील मैदानात

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान या पिता-पुत्राला जीवे मारण्याची धमकी मिळाली. यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलिम खान सकाळी जॉगिंगला गेले असताना एका बाकड्यावर ते विश्रांतीसाठी बसले होते.

या बाकड्यावर धमकीचे पत्र ठेवलेले होते. यामध्ये सलमान खान आणि सलीम खान यांना पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्याप्रमाणे मारण्यात येईल, असे म्हटले आहे. या प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून गतीने तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, सलमान खानचे घर आणि ज्या ठिकाणी हे धमकीचे पत्र मिळाले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या सीसीटीव्हीतून जे कोणी संशयित आरोपी सापडतील त्यांना बोलावून त्यांची चौकशी केली जाणार आहे. कायदा आणि सुव्यस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.

सलमान खान आणि त्यांच्या वडिलांना बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रेकी करून ती चिठ्ठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्हींची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या