26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनक्रिती करतेय प्रभासला डेट?

क्रिती करतेय प्रभासला डेट?

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमधील तरुणांचा क्रश असणारी अभिनेत्री क्रिती हल्ली अभिनेता प्रभासला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु दोघेही या बाबतीत कुठलीच प्रतिक्रिया देत नाहीत. क्रिती लवकरच प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच क्रितीने ‘कॉफी विथ करण’ या शो दरम्यान प्रभासला केलेला कॉल सोशल मीडियावर चांगलाच नोटीस झाला. ‘आदिपुरुष’च्या शूटिंगसेटवर पहिल्याच दिवशी क्रिती आणि प्रभासचे चांगले बाँडिंग झाल्याचीही चर्चा होती.

या चर्चांना उधाण येताच चाहते चकित झाले होते. कारण प्रभास हा फार लाजाळू स्वभावाचा आहे. क्रिती आणि प्रभासची मैत्री फारच खास असल्याचेही म्हटले जातेय. या दोघांनी अजूनही त्यांच्या नात्याबाबत कुठलेही भाष्य केले नसले तरी त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आता सोशल मीडियावर चांगलेच उधाण आले आहे.

क्रिती आणि प्रभासची जोडी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी चाहते उत्सुक असून त्यांच्या लव्ह केमिस्ट्रीबाबत जाणून घेण्यासही चाहत्यांना रस आहे. क्रिती आणि प्रभासचा आगामी चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या