मुंबई : अभिनेत्री प्रियंका आणि निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वीच मुलगी मालती सहा महिन्यांची झाली म्हणून वाढदिवस साजरा केला होता.पण त्यातच आता महत्त्वाच्या सूत्रांकडून म्हणजे प्रियंकाच्या निकवर्तीयांकडून बातमी कळतेय की प्रियंका-निकने दुस-या बाळाची देखील तयारी सुरु केली आहे.
दरम्यान जानेवारी २०२२ मध्ये,प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून एका छोट्या बाळाचे आपल्या आयुष्यात वेलकम केले. प्रियंका आणि निक यांनी या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा-जोनस असे ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत मुलीची झलकही प्रियंका-निकने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अर्थात,अजून काही चाहत्यांना तिचा चेहरा दिसण्याचं भाग्य लाभलेलं नाही,कारण कपलने याबाबतीत योग्य ती काळजी व्यवस्थित घेतली आहे. मालती सध्या ६ महिन्यांची आहे.
प्रियंका आणि निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वीच मालती सहा महिन्यांची झाली म्हणून वाढदिवस साजरा केला होता. त्या सोहळ्याचे फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. कपलच्या निकटवर्तीयांकडून माहिती मिळत आहे की,प्रियंका आणि निकला आपल्या मुलीच्या आयुष्यात भावा-बहिणीची कमतरता ठेवायची नाही. त्यामुळे दोघेही सरोगसीच्या माध्यमातून दुस-या बाळाच्या तयारीत आहेत.
प्रियंका आणि निकचं म्हणणं आहे की आयुष्यात भावा-बहिणीचं प्रेम मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मालतीच्या बाबतीतही ते तसाच विचार करत आहेत. आता लगेच नाही पण काही महिन्यांनी ते दुस-या बाळाचे प्लॅनिंग करण्याच्या विचारात आहेत. पण जेव्हा देखील हा विचार पक्का होईल तेव्हा सरोगसीच्या माध्यमातून त्या दुस-या बाळाला जन्म दिला जाईल. दुस-या बाळाचं प्लॅनिंग हे दोघे करत आहेत यात काहीच डाऊट नाही,फक्त ते कधी करणार एवढेच अजून ठरायचे आहे.