37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमनोरंजनदेश एकसंध राहणे महत्त्वाचे; अभिनेता सोनू सूद

देश एकसंध राहणे महत्त्वाचे; अभिनेता सोनू सूद

एकमत ऑनलाईन

मुंबई : मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून सध्या राजकारण ढवळून निघाले आहे.

मशिदीवरील भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेता सोनू सूद याने या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच सोनू सूदने शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी मीडियाशी बोलताना त्याने भोंग्यांच्या मुद्यावर मत मांडले.

आपण सर्व जात-धर्म यातून बाहेर पडलो तरच देशाची प्रगती होऊ शकेल, असे मला वाटते. देश एकसंध राहणे महत्त्वाचे आहे. माझ्या मते, जी ताकद हनुमान चालिसामध्ये आहे, तीच ताकद नमाज किंवा अजानमध्ये आहे. दोन्हीही ऐकण्यासाठी तितक्याच चांगल्या वाटतात. धर्मात अडकून पडलात तर लोकांचे प्रश्न कधीही सुटणार नाहीत. देशात रोजगार किंवा इतरही अजून गंभीर समस्या आहेत,असे तो म्हणाला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या