34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमनोरंजनजॅकी श्रॉफने केले घरकाम करणा-या मुलीच्या कुटुंबाचे सांत्वन

जॅकी श्रॉफने केले घरकाम करणा-या मुलीच्या कुटुंबाचे सांत्वन

एकमत ऑनलाईन

पुणे : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. याच साधेपणाचे उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या घरात घरकाम करणा-या तरुणीच्या आजीचे निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर जॅकी श्रॉफ थेट या मुलीच्या घरी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर या ठिकाणी पोहोचले. जॅकी श्रॉफ यांच्याकडे काम करणा-या दीपाली तुपे या तरुणीच्या आजीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते.

वयाची शंभरी ओलांडलेल्या तान्हाबाई ठाकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर जॅकी स्वत: दीपालीच्या आजीच्या घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. जॅकी श्रॉफ हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वरती आलेले अभिनेते आहेत. जॅकी श्रॉफ यांनी सुरुवातीचे आयुष्य हे चाळीत काढले आहे. त्यामुळे त्यांची सर्वसामान्यांशी नाळ जोडली गेली आहे. जॅकी श्रॉफ यांचा मावळ या ठिकाणी एक बंगला आहे. अनेकदा ते मुंबईहून इकडे आराम करण्यासाठी येत असतात. या दरम्यान त्यांना त्यांच्याकडे काम करणा-या दीपालीच्या आजीचे शंभराव्या वर्षी नुकतेच निधन झाल्याची माहिती समजली.

त्यानंतर त्यांनी लगेच दीपालीच्या आजीचे घर गाठत ठाकर कुटुंबाचे सांत्वन करत धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घरातील सर्व सदस्यांशी चर्चा करत त्यांची विचारपूसदेखील केली. जॅकी यांच्यासारखा मोठा अभिनेता आजीच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी आपल्या घरी आल्याचे पाहून ठाकर कुटुंब भारावून गेले होते. जॅकी यांनी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर बसून घरातील सगळ्यांची विचारपूस केली. या अगोदरसुद्धा जॅकी श्रॉफ यांनी आपल्या साध्या वागणुकीमधून आपल्या चाहत्यांची मने जिंकली होती.

औरंगाबाद, परभणीत लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या