25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमनोरंजनजान्हवी आणि खुशी कपूर करत होत्या अक्षत राजनला डेट?

जान्हवी आणि खुशी कपूर करत होत्या अक्षत राजनला डेट?

एकमत ऑनलाईन

मुंबई : जान्हवी कपूर हळूहळू बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ फिल्मी बॅकग्राऊंडमुळे तिला चित्रपट मिळत असल्याचे मानले जात होते, मात्र जान्हवी हा टॅग हटवण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच तिच्याबद्दलच्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या अफवाही उडत असतात.

जान्हवीला विचारण्यात आले की, सर्व अफवांमध्ये सर्वात वाईट अफवा कोणती आहे? तर यावर त्याचे म्हणणे होते की मी ऐकले होते की, ‘मी आणि बहीण खुशी कपूर एकाच व्यक्तीला डेट करत आहोत, हे खूप त्रासदायक होते.’ सध्या जान्हवीची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. जान्हवी पुढे म्हणते की, अफवांच्या बाजारातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचे कुटुंब देखील त्यात ओढले जाते.

जान्हवी म्हणाली, ‘आम्हा दोघांबद्दल अशी अफवा होती की मी अक्षत राजनला डेट करत आहे आणि त्यानंतर माझे ब्रेकअप झाले आणि मग खुशीने त्याला डेट करायला सुरुवात केली. मी किंवा खुशी दोघांनीही त्याला डेट केले नाही. तो आमचा बालपणीचा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे डेटिंगच्या गोष्टी या केवळ अफवा आहेत. काही दिवसांपूर्वी अशीही अफवा पसरली होती की, बोनी कपूर जान्हवीला रुपये देऊन चित्रपट मिळवून देतात. जान्हवी कपूरने २०१८ मध्ये ईशान खट्टरसोबत ‘धडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या