23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमनोरंजनभावा सोबतचे रक्षाबंधन आठवून जान्हवी झाली भावूक

भावा सोबतचे रक्षाबंधन आठवून जान्हवी झाली भावूक

एकमत ऑनलाईन

मुंबई : जान्हवीने तिच्या आतापर्यंतच्या रक्षाबंधनच्या काही खास आठवणी शेअर केल्या. ती म्हणाली, ‘जेव्हा मी पहिल्यांदा अर्जुन भैय्या (अर्जुन कपूर) ला राखी बांधली होती ती माझ्या आजतागायत लक्षात आहे. तो क्षण माझ्यासाठी स्पेशल होता. खूप वर्षापूर्वी हे घडले नाही, अगदी काहीच वर्षापूर्वी पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.’

जान्हवी म्हणाली की,‘आपल्या भावा-बहिणीच्या सोबत आपण असणं यापेक्षा सुरक्षित भावना कोणतीच नाही किंवा कोणी ती देऊ शकत नाही. मला वाटतं माझ्या भावा-बहिणीकडून मिळणा-या प्रेमानेच मी वर्षागणिक अधिक सक्षम बनत चालले आहे. आणि हे गेल्या काही वर्षात घडत गेले आहे. मी आणि खुशी एकमेकींविषयी खुप प्रोटेक्टिव्ह होतो पण आता यात दोन जण अजून सामिल झाले आहेत ते म्हणजे अर्जुन भय्या आणि अंशुला दीदी. आम्ही संकटात एकमेकांसोबत कायम राहू ही भावना मनात घट्ट रुजली आहे.

११ ऑगस्टला रक्षाबंधन हा सण देशभरात साजरा केला जाईल. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच या सणाचा आनंद घेताना दिसतील. जान्हवी कपूर देखील या खास दिवशी आपल्या भावा-बहिणीसोबत धम्माल करत एकत्र हा सण साजरा करताना दिसणार आहे. जान्हवी अर्जुन कपूर,अंशुला,खुशी कपूर आणि आपल्या इतर चुलत भावंडांसोबत यंदाची रक्षाबंधन साजरी करताना दिसेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या