16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमनोरंजनजया बच्चन पुन्हा भडकल्या!

जया बच्चन पुन्हा भडकल्या!

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी त्या वेगळयाच कारणामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी मुंबईमधील पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या काही फोटोग्राफर्सवर भडकल्या होत्या. आता पुन्हा जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकल्या आहेत. नुकताच जया बच्चन यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये दिसत आहे की, घराबाहेर फोटो काढण्यासाठी आलेल्या फोटोग्राफर्सवर जया बच्चन या भडकल्या आहेत.

व्हायरल व्हीडीओमध्ये दिसत आहे की, बच्चन कुटुंबाचे दिवाळी सेलिब्रेशन कॅमे-यात कैद करण्यासाठी काही फोटोग्राफर्स अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेर आले होते. यावेळी जया बच्चन यांनी घराबाहेर येऊन फोटोग्राफर्सला खडे बोल सुनावले. जया यांनी काही अंतरापर्यंत फोटोग्राफर्सचा पाठलाग देखील केला.

व्हीडीओला नेटक-यांनी केल्या कमेंट्स
एका नेटक-याने जया बच्चन यांच्या व्हायरल झालेल्या व्हीडीओला कमेंट केली, या नेहमी चिडलेल्याचे असतात. पुढच्या वेळी त्या आनंदी दिसतील असा व्हीडीओ शेअर करा तर दुस-या युझरने कमेंट केली, या नेहमी रागवतात का?

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या