24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home मनोरंजन जिया खान आत्महत्या प्रकरणाला पुन्हा वळण

जिया खान आत्महत्या प्रकरणाला पुन्हा वळण

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘निश:ब्द’, ‘गजनी’ फेम अभिनेत्री जिया खान अनेकांना आठवत असेल. एकाएकी केलेल्या आत्महत्येमुळे ती चर्चेत आली होती. आता तिच्या आत्महत्येसंदर्भाने अजून एक नवी घडामोड समोर आली आहे. जिया खानने २०१३ साली आत्महत्या केली होती. त्यानंतर तिची आई राबिया खान यांनी जियाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरले म्हणून अभिनेता आदित्य पांचोलीच्या कुटुंबीयांवर आरोप केले होते. आता आदित्य पांचोली, त्यांची पत्नी अभिनेत्री झरीना वहाब आणि मुलगी सना पांचोली हे तिघे मुंबई हायकोर्टात गेले आहेत. सूरज पांचोली आणि जिया खान यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यावरूनच झालेल्या मतभेदातून जियाने टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोप आहेत.

या तिघांची राबिया यांच्याविरुद्ध कोर्टात जाण्याची खरंतर ही पहिलीच वेळ नाही. राबिया यांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी जबाबदार धरलं जावं या मागणीसाठी त्यांनी याआधीही बºयाचदा कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. राबिया या तिघांबाबत सतत बदनामीकारक विधानं करत असल्याची त्यांची तक्रार आहे. २०११ते २०१५ मध्ये, तीन वेळा मुंबई उच्च न्यायालयाने राबिया यांना पांचोली कुटुंबाबत अशी विधानं न करण्याबाबत समज दिली होती. २०१७ मध्ये मुंबई हाय कोर्टासमोर उपस्थित राहत राबिया यांनी सांगितले होते, की यापुढं त्या अशी विधानं करणार नाहीत आणि पांचोली कुटुंबियांची बदनामी करणारी प्रेस रिलीजेस अथवा मुलाखती बंद करतील.

पांचोली यांची याचिका काय म्हणते?
आता पांचोली यांनी फाईल केलेली याचिका सांगते, की कोर्टाच्या अंतरिमकालीन आणि अंतरिम आदेशाची माहिती असून आणि कोर्टासमोर अशी काही विधाने न करण्याचे लेखी कबूल करूनही राबिया खान यांनी पुन्हा बदनामीकारक विधाने करणे सुरूच ठेवले आहे. ट्विटर, युट्युब आणि इतरही सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सवर त्या असी विधाने करत आहेत.’

पांचोली कुटुंबीय म्हणाले, की सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूनंतर राबिया यांनी पुन्हा आमच्यावर शाब्दिक हल्ले सुरू केलेत. पांचोली यांचे वकील प्रशांत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत युट्युब, ट्विटर आणि वृत्त वाहिन्यांच्या अनेक लिंक जोडलेल्या आहेत. याचिचेत हेसुद्धा सांगितले की राबिया यांनी नवं ट्विटर खातं सुरू केलं आहे. याचे २२००० फॉलोअर्स असून, यावरून सतत ट्विट्स केली जातात. ‘राजकीय वरदहस्त असलेल्या बॉलिवुडमाफिया वडिलांनी सीबीआयला मॅनेज केलं असून ते कधीच सत्य बाहेर येऊ देणार नाहीत’ अशी ही ट्वीट्स आहेत.या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी अपेक्षित आहे. राबिया यांनी विविध माध्यमांतून केलेली बदनामीकारक विधाने मागे घ्यावीत असे याचिकेत म्हटले आहे.

आधुनिकता आली; अवीटतेचे काय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या