37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमनोरंजनजरा याद करो कुर्बानी ! वीरमरणावर अमिताभ बच्चन यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

जरा याद करो कुर्बानी ! वीरमरणावर अमिताभ बच्चन यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

एकमत ऑनलाईन

मुंबई : चीनसोबत प्रत्यक्ष ताबारेषेवर गलवाण खोर्‍यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय सैनिकांना वीरमरण आले असून त्यांच्या या वीरमरणावर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘ज़रा आँख में भर लो पानी; जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुर्बानी.’ या जवानांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांनी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिले आहे. भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांना माझा सॅल्यूट, जय हिंद, असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

भारत-चीन दरम्यान सोमवारी रात्री सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना चीनने आगळीक करून भारतीय सैनिकांवर शस्त्रांनिशी हल्ला केला. त्यात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले, तर चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत. तब्बल 14 हजार फूट उंचीवरच्या या भागात गलवाण नजीक ही धुमश्चक्री झाली. या चकमकीमुळे परिस्थिती स्फोटक बनली आहे. गलवाण खोर्‍यात व पूर्व लडाखमधील इतर ठिकाणी अशा चकमकी गेल्या काही आठवडयात झाल्या पण प्राणहानी प्रथमच झाली आहे.

Read More  चीननं गलवान खोर्‍यात केलेल्या हल्ल्यात कर्नल संतोष बाबूंना हौताम्य

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या