27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमनोरंजन‘काली’चे पोस्टर हटवले ; भारताच्या विनंतीवर ट्विटरची कारवाई

‘काली’चे पोस्टर हटवले ; भारताच्या विनंतीवर ट्विटरची कारवाई

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘काली’ या डॉक्युमेंट्री सिनेमाच्या पोस्टरचा वाद काही दिवसांपासून पाहायला मिळतो आहे. निर्माती लीना मणिमेकलाई हिच्या ‘काली’ या डॉक्युमेंट्री सिनेमात कालीमाता सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. या पोस्टरवर संपूर्ण देशातून विरोध करण्यात आला.

हा वाद चांगलाच रंगला आहे आणि आता भारताच्या विनंतीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरने ‘काली’चे पोस्टर ट्विटरवरून हटवले आहे. ‘काली’ या डॉक्युमेंट्री सिनेमाला हिंदू संघटनांकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप सिनेमाच्या निर्मातीवर करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

‘काली’च्या आक्षेपार्ह पोस्टरवर देशात विविध ठिकाणी कारवाईची मागणी करण्यात आली होती. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ट्विट टॅग करून सिनेमाची दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई हिला अटक करण्याची मागणी करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या