16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमनोरंजनकंगना रनौतचा इंस्टाग्रामसोबत पंगा

कंगना रनौतचा इंस्टाग्रामसोबत पंगा

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना कनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा तिच्यावर टीका केली जाते. आता पंगा क्वीन पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकली आहे. ट्वीटवर बंदी घातलेली असताना कंगनाने आता इंस्टाग्रामवर पंगा घेतला आहे. तिने इंस्टाग्रामला वाह्यात म्हटलं आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने इंस्टा स्टोरी शेअर करत म्हटलं आहे, ‘इंस्टाग्राम’ या अ‍ॅपचा वापर फक्त फोटो शेअर करण्यासाठी होतो. इंस्टाग्रामवर आपण मांडलेले आपले विचार एका दिवसात गायब होतात. ज्यांचा स्वत:च्या विचारांवर विश्वात नसतो त्यांच्यासाठी हे अ‍ॅप योग्य आहे .

कंगनाने पुढे लिहिले आहे, पण काही मंडळींचा त्यांच्या लिखानावर, मतावर विश्वास असतो, त्यांचे काय? विचारांचा संग्रह करायला मला आवडते. एखाद्या गोष्टीवर थोडक्यात भाष्य करण्यासाठी या अ‍ॅपचा योग्यपद्धतीने वापर करता येऊ शकतो .

कंगनाचे ट्विटरवर कमबॅक?
कंगनाने २०२१ साली ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने तिचे ट्विटर अकाऊंट बॅन करण्यात आले आहे. पण आता इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून कंगना ट्विटरवर पुन्हा येऊ शकते अशा चर्चांना वेग आला आहे. कंगनाने ट्विटरवर पुन्हा यावे अशी तिच्या चाहत्यांचीदेखील इच्छा आहे. कंगनाला तिचे ट्विटर अकाऊंट पुन्हा कधी मिळणार यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या