28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमनोरंजनकंगनाने घेतले श्रीकृष्णाचे दर्शन

कंगनाने घेतले श्रीकृष्णाचे दर्शन

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना राणावत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे वारंवार चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगना सोमवारी आपल्या कुटुंबीयांसोबत वृंदावनमधील ठाकूर बांके बिहारी मंदिरात गेली होती.

यावेळी मंदिरात गेल्यावर कंगनाने श्री कृष्णाची मनोभावे पूजा केली आणि त्यांचे दर्शन घेतले. दररोज श्रीकृष्णाच्या या मंदिरामध्ये देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सोमवारी कंगना राणावतदेखील आपल्या कुटुंबीयांसोबत तिथे पोहोचली.

श्री धाम वृंदावनमध्ये श्रीकृष्णाच्या मनमोहक रूपाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना देवाच्या भक्तिरसात रंगून गेलेली दिसली. कंगनाने प्रार्थना करत राधे राधेचा जयघोष केला. त्यानंतर कंगना आपल्या कुटुंबीयांसह निधिवन राज मंदिराकडे रवाना झाली. दरम्यान, मथुरेतील फोटो कंगनाने तिच्या सोशल मीडियावर देखील शेअर केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या