25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमनोरंजनमी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही-कंगना

मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही-कंगना

एकमत ऑनलाईन

मुंबई : कंगना रनौत मुंबईत आल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना वादाला शाब्दिक युद्धाचं स्वरूप आलं आहे. शिवसेना विरुद्ध कंगना हे Twitter war तर गेले अनेक दिवस सुरू आहेच. कंगनाच्या ताज्या Tweet ने त्यात भर पडली आहे. आता तर उद्धव ठाकरेंचं नाव घेत कंगनाने मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे.

‘मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही’, असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांचं नाव घेत धमकी दिली आहे. करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांची गँग येऊन आज माझं उद्ध्वस्त केलं. आता घर फोडाल, उद्या माझं तोंड आणि माझा जीवही घ्याल. पण जगाला मला दाखवून द्यायचं आहे तुम्ही काय काय केलंय ते, असं म्हणत कंगनाने नवं Tweet करत उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे.

मुंबई महापालिकेनं कंगना रणौतच्या ऑफिसवर हातोडा मारल्यानंतर कंगना संतप्त झाली आहे. अनधिकृत बांधकाम म्हणजे बीएमसीने कंगनाचं ऑफिसमध्ये तोडफोड केली. कंगनाने यानंतर आपल्या ऑफिसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचं कंगना म्हणाली आहे.

कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेनं आपल्या ऑफिसची काय अवस्था केली हे कंगनाने व्हिडीओ शेअर करत दाखवलं. कंगनाच्या मुंबईतील वांद्रे येथील कार्यालयामध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप करत पालिकेने मंगळवारी कंगनाला नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला 24 तास उलटल्यानंतर पालिकेकडून कारवाई सुरू झाली.

संतप्त कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि सोशल मीडियावर युद्धाला तोंड फुटलं. कंगनाचे समर्थक तिची बाजू घेत असले, तरी मुंबईकर ड्रामा क्वीनवर नाराज झाले. मुंबई महापालिकेच्या या कारवाईस सुरूवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा मुंबईला पाकिस्तान असल्याचं म्हटलं. “मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता PoK झाली आहे”, असं ट्वीट तिनं केलं.

ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देता येणार:डॉ. तोटरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या