30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home मनोरंजन कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद होणार?

कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद होणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. देशातील विविध मुद्यांवर भाष्य करण्यासाठी ती ट्विट करत असते. कंगनाचे ट्विट वादग्रस्त असल्याने तिच्या ट्विटर अकाऊंटवर स्थगिती किंवा बंद करण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तसेच, या याचिकेवर लवकरात लवकरात सुनावणी घेण्याची विनंती याचिकादाराने कोर्टाकडे केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घालावी अशी याचिका अ‍ॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच, या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती देशमुख यांनी केली आहे. या मागणीवर न्यायालयाने ९ मार्चला सुनावणी ठेवली आहे.

कंगना राणावत आता शेतकरी आंदोलनाविषयी आक्षेपार्ह ट्विट करत असल्याने लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती याचिकादार वकील काशिफ अली खान देशमुख यांनी केली होती. त्यानंतर याप्रश्नी न्यायालयाने मागील सुनावणीत उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या कायदेशीर मुद्यांवर स्पष्टीकरण मांडा, असे सांगून ९ मार्चला सुनावणी ठेवली आहे.

बॉलिवूड व महाराष्ट्र सरकारवर टीका करतानाही तिने वादग्रस्त वक्तव्येही केली होती. वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कंगनाच्या काही आक्षेपार्ह ट्विटबद्दल एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिल्यानंतर वांदे्र पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. तसेच, अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयातही कंगनाच्या काही आक्षेपार्ह ट्विट्सविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायालय कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाईचे आदेश देणार का? हे पाहण्े महत्त्वाचे ठरणार आहे.

 

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार – अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या