25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनप्रियकराने फसवल्यामुळे कन्नड अभिनेत्री चंदनाने केली राहात्या घरी आत्महत्या

प्रियकराने फसवल्यामुळे कन्नड अभिनेत्री चंदनाने केली राहात्या घरी आत्महत्या

एकमत ऑनलाईन

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट रेकॉर्ड केली आहे, प्रियकराला ठरविले आत्महत्येसाठी जवाबदार

बंगलुरू : गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. आता कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चंदनाने आत्महत्या केली असून तिने यापूर्वी तिच्या प्रियकरावर फसवल्याचा आरोप लावला आहे. चंदना ही केवळ २९ वर्षांची असून ती बंगलुरू येथे राहात होती. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आाहे आणि हा व्हिडिओ तिचा प्रियकर आणि तिच्या घरातल्यांना पाठवला आहे.

चंदनाने या व्हिडिओमध्ये तिचा प्रियकर दिनेशने तिला फसवल्याचा आरोप लावला आहे. हा व्हिडिओ घरातल्यांना मिळाल्यानंतर त्यांनी शेजारच्यांना कळवून चंदनाला तात्काळ रुग्णालयात नेण्यास सांगितले. पण रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चंदना आणि दिनेश एकमेकांसोबत अनेक वर्षांपासून नात्यात होते. दिनेशसोबत लग्न करण्याची तिची इच्छा होती. पण तो नेहमीच या गोष्टीसाठी टाळाटाळ करत होता. या व्हिडिओद्वारे चंदनाने सांगितले आहे की, चंदनासोबत नात्यात असताना देखील दिनेशचे एका मुलीसोबत अफेअर होते. त्याने तिला फसवले असे ती या व्हिडिओत बोलताना दिसत आहे.

Read More  वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्‍चितता दूर करा ; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

चंदनाच्या वडिलांनी दिनेशविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांनी सांगितले आहे की, चंदना आणि दिनेश गेल्या पाच वर्षांपासून नात्यात होते. या नात्याबद्दल आम्हाला सगळ्यांना माहीत होते. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार दिनेशने तिच्याकडून काही महिन्यांपूर्वी पाच लाख रुपये उधार घेतले होते आणि तेव्हापासून तो तिला टाळत होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या