मुंबई : या वर्षात बॉक्स ऑफिसवर एकाच चित्रपटाने जादू केली तो म्हणजे ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’. या चित्रपटाने भल्याभल्यांना वेड लावले. सर्व स्तरांवर या चित्रपटाचे कौतुक झाले.
आता या चित्रपटाच्या यशात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘कांतारा’ या चित्रपटाचे नामांकन ऑस्कर २०२३ साठी पाठवण्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्माते हॉम्बल फिल्म्सने अलीकडेच ही घोषणा केली आहे. अगदी शेवटच्या क्षणी ऑस्कर २०२३ च्या नामांकनासाठी ‘कांतारा’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे.s
आपल्या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळावे, जेणेकरून चित्रपटात दाखवलेला संदेश जागतिक स्तरावर ओळखला जावा, अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. हॉम्बल प्रॉडक्शनचे संस्थापक विजय किरगंडूर म्हणाले, आम्ही ऑस्करसाठी ‘कांतारा’साठी नामांकन दाखल केले आहे. या चित्रपटातून आम्ही जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, अशी आमची इच्छा आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे की, ऑस्कर २०२२ साठी दोन चित्रपट निवडले गेले आहेत. यामध्ये एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ व्यतिरिक्त गुजराती चित्रपट ‘चेल्लो शो’ म्हणजेच ‘लास्ट फिल्म शो’ आहे. आपल्या चित्रपटाला ऑस्करमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राजामौली यांनी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटाने रिलीज होताच देश-विदेशात चांगलीच खळबळ उडवून दिली होती.
तो ऑस्करच्या ‘सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’ श्रेणीत नामांकनासाठी पाठवण्यात आला होता, पण काही कारणास्तव तो निवडला गेला नाही. यानंतर, निर्मात्यांनी चित्रपटासंदर्भात मोहीम सुरू केली आणि ‘आरआरआर’ १४ श्रेणींमध्ये नामांकनासाठी सादर केले गेले.