मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही आयकॉनिक चित्रपट आहेत जे आजही प्रेक्षकांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’ हा होय .
नुकतीच एका मुलाखतीदरम्यान निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला या चित्रपटाच्या रिमेकबाबत विचारणा केली असता, त्याने आपल्या ड्रीम कास्टचा खुलासा केला आहे. करण जोहरला विचारण्यात आले होते, ‘कुछ कुछ होता है’चा रिमेक बनला तर त्याची स्टारकास्ट कोणती असेल?
यावर बोलताना करणने सांगितले, या चित्रपटाचा रिमेक बनला तर त्यामध्ये शाहरूख खानच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंह असेल, काजोलच्या जागी आलिया भट्ट असेल आणि राणी मुखर्जीच्या जागी जान्हवी कपूर असेल.