मुंबई : अभिनेत्री करीना कपूर सध्या नवीन वर्षाचे स्वागत करायला आपला पती सैफ अली खान आणि मुले तैमूर आणि जेहसोबत स्वित्झर्लंडला रवाना झाली आहे.
दरम्यान बॉलिवूडमध्ये गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अनेक सिनेमांतून वेगवेगळ्या भूमिका साकारत करीना कपूरने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. करिनाने या मुलाखतीत आपल्या नवीन वर्षातील संकल्पांना देखील उजाळा दिला. ती म्हणाली, या वर्षात मी गोष्टी बॅलन्स ठेवायला शिकणार आहे.
जेव्हा तुम्हाला दोन मुले असतात आणि त्यातूनही तुम्हाला काम करायचे असते तेव्हा अनेकदा तारांबळ उडते.अगदी एका पायावर उभे राहून जसे आपण आपले शरीर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी जशी कसरत आपण करतो तशीच कसरत मुलं सांभाळून काम करताना होते.
नवीन वर्षात आपल्याला जास्तीत जास्त वेळ आपल्या पालकांसोबत घालवायचा आहे असे देखील करीना म्हणाली. तसेच, अधिकाधिक आनंदी राहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत असे नमूद करताना करिनाने एक कानमंत्र चांगला दिला आहे.