28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home मनोरंजन हम दिल दे चुकेसाठी करीना होती पहिली पंसती

हम दिल दे चुकेसाठी करीना होती पहिली पंसती

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ १९९९ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या या सिनेमाने ऐश्वर्या रायला नवी ओळख मिळवून दिली. ‘हम दिल दे चुके सनम’च्या या नंदिनीनं ऐश्वर्या फक्त एक शोभेची बाहुली अशी टीका करणा-यांची तोंडं कायमची बंद करुन टाकली. सिनेमात ऐश्वर्याच्या अभिनय कौशल्यासोबतच डान्सचंही तितकंच कौतुक झालं. या सिनेमानं रसिकांवर जादू केली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं.

प्रियकरावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याच्यासाठी नव-याला सोडून सातासमुद्रापार जाण्याची तयारी असलेली या नंदिनीनं रसिकांवर जादू केली. ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अजय देवगन सारख्या स्टारकास्टने सजलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. पण तुम्हाला माहिती आहे का? ऐश्वर्याने साकारलेल्या नंदिनी या भूमिका आधी दुर्स­या अभिनेत्रीला आॅफर केली गेली होती. म्हणजेच या भूमिकेसाठी ती पहिली पसंती नव्हती.
संजय लीला भन्साळीने ऐश्वर्याआधी करीना कपूरला ही भूमिका आॅफर केली होती. पण त्याचवेळी करिना उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असल्यामुळे तिने ही आॅफर नाकारली होती जर करिनाने होकार दिला असता तर आज तिचा हा डेब्यू चित्रपट ठरला असता.

करीना कपूरने अभिषेक बच्चनसह २००० साली दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या रिफ्यूजी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. करीनाने आजपर्यंत भंसालीसह एकही चित्रपटात काम केले नाही़ भन्साळींनी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाची आॅफरही करिनाला दिली होती पण ती यातही काम करू शकली नाही. तेव्हाही बेबो दुस-याच कामात व्यस्त होती.

दह्याचे फायदे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या