मुंबई : ग्लॅमर इंडस्ट्रीतच नाही अगदी सर्वसामान्यांमध्येही या दिवसाची,या क्षणाची चर्चा रंगताना दिसते. तो क्षण,तो दिवस अखेर आला आणि फेमिना ‘मिस इंडिया वर्ल्ड २०२२’ च्या विजेतीची रविवारी ३ जुलैच्या रात्री उशिरा घोषणा करण्यात आली. भारताला या वर्षीची आपली नवीन ब्यूटी क्वीन अखेर मिळाली.
कर्नाटकच्या सिनी शेट्टीला मुंबईमधील खकड वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये फेमिना ‘मिस इंडिया वर्ल्ड’चा मानाचा मुकूट घातला गेला. शेट्टी २१ वर्षाची आहे. ती कर्नाटकची राहणारी आहे. अकाऊंट आणि फायनान्समध्ये तिनं डिग्री घेतली आहे. आणि आता ती साएफए चे देखील शिक्षण घेत आहे. भरनाट्यमचे शास्त्रशुद्ध शिक्षण देखील ती घेत आहे.
‘मिस इंडिया वर्ल्ड २०२२’ स्पर्धेत राजस्थानच्या रुबल शेखावनं फर्स्ट रनर अपचा खिताब ंिजकला आहे. रुबल राजस्थानच्या शाही घराण्यातून असल्याचं बोललं जात अहे. रुबलचं म्हणणं आहे की जिंकण्यापेक्षा आपली प्रगती खूप महत्त्वाची असते. या स्पर्धेत उत्तर प्रदेशची शिनाता चौहान सेंकेंड रनर अप ठरलेली आहे.
रविवारी संध्याकाळी ‘फेमिना मिस इंडिया २०२२’ च्या भव्य-दिव्य अशा शो मध्ये ३० राज्यांच्या विनर्सना परिक्षक आणि जगासमोर सादर केलं गेलं. फॅशन डिझायनर अभिषेक शर्माच्या रिसॉर्ट वियर कलेक्शननं डिझाईन केलेले कपडे त्या सर्व सौंदर्यवतींनी परिधान केले होते.