22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमनोरंजनकार्तिक आर्यनने साईन केला ‘आशिकी ३ ’

कार्तिक आर्यनने साईन केला ‘आशिकी ३ ’

एकमत ऑनलाईन

मुंबई : कार्तिक आर्यनच्या करिअरची गाडी सध्या सूसाट धावतेय. यावर्षी आलेला त्याचा ‘भुलभुलैय्या २’ हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. यानंतर त्याच्या हातात अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत.

‘शहजादा’चे शूटींग पूर्ण झाले आहे आणि कालपरवा त्याने ‘सत्यप्रेम की कथा’चे शूटींग सुरू केले आहे. आता काय तर कार्तिकच्या हाती एक मोठा प्रोजेक्ट लागला आहे. होय, कार्तिक आता ‘आशिकी ३’ या सुपरहिट फ्रेंन्चाइजीमध्ये झळकणार आहे.

आशिकी आणि आशिकी २ हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते. आता ‘आशिकी ३’ची तयारी सुरू झाली आणि यात कार्तिकची वर्णी लागलेली पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. कार्तिकने स्वत: याबद्दलची घोषणा केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या