21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमनोरंजन‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरीया’ गाणे प्रदर्शित

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरीया’ गाणे प्रदर्शित

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट हा सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘ब्रह्मास्त्र’या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून त्यातील ‘केसरीया’ हे गाणे चांगलेच चर्चेत आहे या चित्रपटासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.या चित्रपटातील केसरिया हे गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे. नुकतंच आलिया भट्टने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

‘केसरीया’ गाण्यात आलिया आणि रणबीरची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्याला लाखो व् ूज मिळाले आहे. या गाण्यात प्रीतम दा, अरिजीत सिंह आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या तिघांचे आवाजाचे जबरदस्त ट्युनिंग दिसत आहे.

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे. ‘आमच्या प्रेमाची धून आता आपली, केसरिया गाणे प्रदर्शित झालं आहे’’, असे कॅप्शन तिने दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या