28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home मनोरंजन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘खिसा’ची निवड

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘खिसा’ची निवड

एकमत ऑनलाईन

मुुंबई : अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहर उमटवणा-या खिसा या मराठी शॉर्टफिल्मची ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. हा महोत्सव १६ ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान गोव्यात होणार आहे. पी. पी. सिने प्रॉडक्शन, मुंबई आणि लालटिप्पा निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भातील अकोला येथे झाले आहे.

इस्तंबूल फिल्म अ‍ॅवॉर्डस् २०२० मध्ये खिसा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथा हे पुरस्कार मिळाले. तर अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणा-या १०व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातही खिसा ने सर्वोत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे मार्च २०२१ मध्ये होणा-या आयएफएच्या वार्षिक लाईव्ह स्क्रीनिंग मेळाव्यात प्रतिष्ठित अशा गोल्डन स्टार पुरस्कारासाठी ही शॉर्टफिल्म पात्र ठरली असून डब्लिन इंटरनॅशनल शॉर्ट अँड म्युझिक फेस्टिव्हल २०२० मध्ये खिसा ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी नामांकन मिळाले आहे. या फेस्टिव्हलमध्ये या शॉर्टफिल्मचे प्रीमिअर ऑनलाईन स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. मुंबई इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही खिसा ने सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताचा पुरस्कार मिळवला आहे.

कॅनडाच्या मॉन्ट्रियल इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल, २६ व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डायोरोमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, अर्जेंटिनाच्या डायोरोमा इंडी शॉर्टस् अ‍ॅवॉर्डस्, ब्युनोस आयर्स, येथील महोत्सवांत खिसा ची अधिकृत निवड करण्यात आली आहे.

 

तामसा येथील प्रसिद्ध भाजी-भाकर पंगत रद्द; सव्वाशे वर्षाची परंपरा खंडीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या