मुंबई : कियारा अडवाणीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कियाराच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे . कियाराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यासोबत एक व्हीडीओ शेअर केला आहे.
काही सेकंदांच्या या व्हीडीओत कियारा तिच्या अदा दाखवत आहे. या व्हीडीओसोबत कियाराने दिलेल्या कॅप्शनमुळे खरी चर्चा रंगली आहे. यात तिने लिहिले आहे की, ‘हे जास्त काळ लपवून ठेवू नका! लवकरच येत आहे… सोबत रहा… २ डिसेंबर.’ कियाराची ही पोस्ट सोशल मीडियावर वा-यासारखी व्हायरल झाली.
दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नात्याची चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरू आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली ही जोडी आहे. ब-याच काळापासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. ‘शेरशहा’पासून त्यांच्यातील केमिस्ट्री ही आणखीनच प्रेक्षकांना भावली होती. दोघेही लवकरच लग्नाचा विचार करत असल्याचाही दावा केला जात आहे.