17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमनोरंजनकोविड चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय बाळाला भेटू देणार नाही; आलिया-रणबीरचा फतवा

कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय बाळाला भेटू देणार नाही; आलिया-रणबीरचा फतवा

एकमत ऑनलाईन

मुंबई : नुकतेच अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर कपूर या दोघांना मुलगी झाली असून हे दोघे आपल्या मुलीची खुप काळजी घेताना दिसत आहेत. आलियाच्या बाळाला भेटायचे असेल तर कोविडची चाचणी करणे बंधनकारक केले आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यावरच बाळासोबत भेट शक्य होणार आहे. मुलीच्या सुरक्षेसाठी जोडप्याने नवा फतवा जाहीर केला आहे.

दरम्यान अभिनेत्री आलिया भट्टने रविवारी एका गोड मुलीला जन्म दिला. आलिया आणि बाळ दोघेपण मस्त आहेत. गुरूवारी आलिया आणि रणबीर बाळाला घेऊन घरी आली. जेव्हा आलिया हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तिला भेट दिली होती. पण आता या छोट्या बाळाला भेटण्यासाठी कठोर नियम केले आहेत.

सध्या कोरोनाचे नियम कडक नसले तरी अजुन कोरोना गेलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर आपले बाळ निरोगी वातावरणात वाढावे असाच विचार आता आलिया आणि रणवीर करत आहेत. बाळाला भेटायचे असेल तर कोविडची चाचणी करणे बंधनकारक आहे. ती निगेटिव्ह आल्यावरच भेट शक्य होणार आहे. कारण नवजात बालकांना रोग आणि संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच बाळाचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून पाहुण्यांना बाळाच्या आजूबाजूला त्यांचा फोन वापरण्याचीही परवानगी दिली जाणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या