मुंबई : आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याआधीच हा सिनेमा चर्चेत आहे. अशातच हा सिनेमा सिनेमागृहापाठोपाठ ओटीटीवरदेखील रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार का यासंदर्भात आमिर म्हणाला, ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ओटीटीवर रिलीज होणार नाही. एक सिनेमा केल्यानंतर सहा महिन्यांनंतरच मी दुसरा सिनेमा घेत असतो. प्रत्येक सिनेमासाठी मी चांगली मेहनत घेतो. त्यामुळेच ‘लाल सिंह चड्ढा’ओटीटीवर रिलीज होणार नाही.
‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाच्या नव्या पोस्टरवरदेखील नेटक-यांकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आमिर आणि करिनाचे समर्थन करत आहेत. ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असे म्हटले जात आहे.
आमिर खान आणि करीना कपूर याआधी ‘थ्री इडियट्स’ या सिनेमात एकत्र दिसले होते. आमिर आणि करीनाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.