22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमनोरंजनललित मोदी-सुष्मिताचे ‘ब्रेकअप’

ललित मोदी-सुष्मिताचे ‘ब्रेकअप’

एकमत ऑनलाईन

मुंबई : ललित मोदीनं बेटर हाफ म्हणत शेअर केलेल्या सुष्मितासोबतच्या फोटोनंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. या दोघांच्या लव अफेअरच्या नेटक-यांमध्ये भन्नाट चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता ललित मोदीने त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या एका बदलामुळे या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ललित मोदीनं त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरून त्यांच्या बेटर हाफचा फोटो बदललाय. त्यामुळे या दोघांचं बिनसलं असल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. माहितीसाठी या ब्रेकअपच्या चर्चांना नेटक-यांनी हवा दिली असून ललित मोदीने सुष्मिता सेनसोबतचा इन्स्टाग्राम प्रोफाईल बदलल्याने या चर्चा रंगल्या.

सुरूवातील ‘सुष्मितासोबत जीवनाची नवी सुरूवात झाली आहे, माय लव’, असं लिहत ललित मोदींनी लांबलचक पोस्ट लिहीली होती. ती पोस्ट बघितल्यानंतर अनेकांनी जिथे या जोडप्याला ट्रोल केलं तिथे अनेकांनी या लव कपलचं कौतुकही केलं होतं. मात्र अचानक मोदींचं इन्स्टाग्राम प्रोफाईल बदललं आणि नेटक-यांनी यांचं ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पसरवल्या आहेत.

ललित मोदीच्या सुष्मितासाठीच्या ‘बेटर हाफ’ पोस्टमध्ये टाकलेल्या रोमँटिक फोटोनंतर सोशल मीडियावर राडा झाला होता. तेव्हापासून या दोघांच्याही वयक्तिक आयुष्याकडेही नेटक-यांचं बारीक लक्ष असतं. ललित मोदींचं इन्स्टा प्रोफाईल बदलताच आता अफेरच्या चर्चांना फुल स्टॉप लागत ललित आणि सुष्मिताच्या ब्रेकअप चर्चांना उधाण आलंय.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या