19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeमनोरंजनउगाच घराबाहेर फिरणार्‍या नागरिकांना लता मंगेशकर यांनी जनतेला आवाहन

उगाच घराबाहेर फिरणार्‍या नागरिकांना लता मंगेशकर यांनी जनतेला आवाहन

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात अनलॉकची हाक देत टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनलॉकच्या पहिल्याच टप्प्यात राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या काळात काही जण अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडत आहे. अशा उगाच घराबाहेर फिरणार्‍या नागरिकांना ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी जनतेला आवाहन केले आहे.

नमस्कार, लॉकडाउन हळूहळू कमी करण्यात येत आहे. मात्र माझी सगळ्यांना एक मनापासून विनंती आहे. कृपया सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या, नियमांचे पालन करा. लॉकडाउन कमी करण्यात येतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की करोना विषाणूचे संकंट टळले आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणार्‍या सुचनांचे आणि नियमांचे पालन करा, असे ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहे. अलिकडेच राज्यात लॉकडाउनच्या अटी शिथील करण्यात आले आहे.

मात्र या काळात अनेक जण अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी दाटून येत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लता मंगेशकर या सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असून अनेकदा समाजात घडणार्‍या घटनांवर त्या व्यक्त होत असतात.

Read More  भारताच्या परकीय चलन साठ्यात विक्रमी वाढ

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या