23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमनोरंजनयुट्युबवर झळकतोय लातूरचा चेहरा; "गावरान हिसका" वेब सिरीज मध्ये स्थानिक कलाकारांना संधी

युट्युबवर झळकतोय लातूरचा चेहरा; “गावरान हिसका” वेब सिरीज मध्ये स्थानिक कलाकारांना संधी

एकमत ऑनलाईन

लातूर : गावरान हिसका या वेब सिरीजमध्ये लातूर व परिसरातील अनेक स्थानिक कलाकारांना संधी मिळत आहे.महेंद्र पतंगे हे या सीरिजमध्ये मुख्य भूमिका करत असून त्यामुळे युट्युब वर सध्या लातूरचे चेहरे झळकत आहेत.. मिरज येथील सुदर्शन सिने सर्व्हिसच्या वतीने ५२ भागांची वेब सिरीज तयार केली जात आहे.यापैकी ९ भाग आतापर्यंत युट्युब वर अपलोड करण्यात आले आहेत.दर शनिवारी एक भाग अपलोड केला जातो.सुदर्शन सिने सर्व्हिसच्या वतीने विविध विषय घेऊन वेब सिरीज तयार केल्या जातात.अनेक शॉर्ट फिल्मही तयार करण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले.अनेक जण बेरोजगार झाले.अशा स्थितीत युवकांची भूमिका काय असावी ? कोरोना काळात समाजाच्या मदतीसाठी काय करावे ?अशा आशयाचे कथानक घेऊन ही वेब सिरीज तयार करण्यात येत आहे.विशेष म्हणजे स्थानिक कलाकारांना यात संधी दिली जात आहे. त्यामुळे लातूरचे चेहरे यूट्यूबवर आणि वेब सिरीज मध्ये झळकत आहेत.महेंद्र पतंगे यांची या वेबसीरीज मध्ये मुख्य भूमिका आहे.इतर वेबसिरीज मध्येही ते मुख्य भूमिका करत आहेत.

विजय दादा मोरे हे सुदर्शन वेब सिरीज निर्मित या चॅनलचे प्रमुख मुख्य प्रवर्तक आहेत.त्यांच्यासोबत राजेंद्र डांगळे,विकास नलावडे, कोमल जाधव,लावण्या जाधव,ऋषिकेश शिंदे, वैष्णवी भोसले असे स्थानिक व महाराष्ट्रातील कलाकार या वेब सिरीज मध्ये काम करत आहेत. लातूरच्या रसिक प्रेक्षकांनी गावरान हिसका ही वेब सिरीज पहावी.लातूरच्या कलाकारांना दाद द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या