19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeमनोरंजनलेकीच्या वयाच्या मनीषाच्या प्रेमात पडले होते नाना

लेकीच्या वयाच्या मनीषाच्या प्रेमात पडले होते नाना

एकमत ऑनलाईन

मुंबई : चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांमध्ये नाना पाटेकर यांचे नाव सामील आहे. आज नानांचा ७२ वा वाढदिवस. नानांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रहार, यशवंत, अग्निसाक्षी, तिरंगा, क्रांतिवीर आणि वेलकम या चित्रपटांसह यापेक्षा जास्त यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, चित्रपटांसोबतच नाना पाटेकर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत.

दरम्यान नाना पाटेकर यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचा छोटासा व्यवसाय होता, पण एके दिवशी त्यांच्या वडिलांच्या जवळच्या मित्राने फसवणूक करून त्यांच्या मालमत्तेसह सर्व काही त्याच्या नावावर केले. या घटनेनंतर त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले होते. त्यामुळे वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी नाना पाटेकर यांना काम हातात घ्यावे लागले.

मीडिया रिपोर्टस्नुसार, नाना पाटेकर यांचे एकदा इंडस्ट्रीतील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मनीषा कोईरालासोबत अफेअर होते. मनीषा कोईराला यांना नेपाळी ब्युटी म्हणूनही ओळखले जाते. ‘खामोशी : द म्युझिकल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जात आहे.

१९९६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी बाप-मुलीची भूमिका साकारली होती. यानंतर नाना आणि मनीषा यांचा ‘अग्निसाक्षी’ हा आणखी एक चित्रपट आला, असे म्हटले जाते की, हा चित्रपट रिलीज होईपर्यंत त्यांचे अफेअर क्लाऊड नाईनवर होते आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला याची कल्पना आली. मीडिया रिपोर्टस्मध्ये असेही सांगण्यात आले आहे की, नाना अनेकदा मनीषाच्या घरी ये-जा करताना दिसत होते. मात्र, त्यांचे नाते शेवटपर्यंत पोहोचू शकले नाही.

याचे मुख्य कारण म्हणजे नाना पाटेकर आधीच विवाहित होते आणि त्यांना आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. तर दुसरीकडे मनीषा कोईरालाही नाना पाटेकर यांच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती. या सगळ्यात नाना आणि मनीषा यांच्यात मतभेद वाढू लागले, त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.
असेही बोलले जात होते की, नानांचे प्रसिद्ध अभिनेत्री त्यावेळची स्टारकी, आयशा झुल्कासोबत प्रेमसंबंध होते.. त्याचा परिणाम नाना आणि मनिषा कोईराला याच्या नात्यावर झाल्याचे चर्चा अजुनही बॉलीवूडमध्ये होत असते. मनीषानं त्यावरुन नानांना परखड शब्दांत सुनावलेही होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अशीही चर्चा नानांच्या चाहत्यांमध्ये रंगत असते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या