22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजन‘काहीतरी नवीन ट्राय करूया’; गौतमी देशपांडे

‘काहीतरी नवीन ट्राय करूया’; गौतमी देशपांडे

एकमत ऑनलाईन

मुंबई : झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे. या मालिकेमुळे गौतमीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.त्यात अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची लहान बहीण असल्याकारणाने तिच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा जास्त होत्या.

अखेर प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरी उतरत तिने अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली. आता गौतमीचा चाहता वर्ग वाढला असून ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. गौतमी सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हीडीओ शेअर करत असते.
अशातच तिने एक नवा फोटो शेअर केला आहे. तिच्या फोटोला दिलेल्या या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ‘काहीतरी नवीन ट्राय करूया’ म्हणत गौतमीने लेहंग्यावर शूज घातलेला फोटो शेअर केला आहे. तिच्या या नव्या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक लाईक्स आणि कमेंट येत आहेत.

‘प्रत्येक वेळी तुझ्यावर प्रेम होतं, खूप सुंदर, छान दिसतेय, तुझा लुक नेहमीच रॉक इट असतो’, अशा अनेक कमेंट गौतमीच्या पोस्टवर येत आहेत.

तिचे चाहते तिच्या प्रत्येक नव्या लुकवर, नव्या पोस्टवर खूप सारं प्रेम देत असतात. गौतमीही सोशल माध्यमांद्वारे चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. दरम्यान ‘माझा होशील ना’ या मालिकेतील सई-आदित्य म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी लवकरच पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोघेही ‘पारिजात’ या म्युझिक व्हीडीओद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे गाणं प्रसिद्ध गायक हृषिकेश रानडे आणि अमित गुजर यांनी गायिले आहे. गौतमी आणि विराजस ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्कंठा आणखीनच वाढली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या