23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमनोरंजनराखीच्या कपड्यांबद्दल मर्यादा आखल्या

राखीच्या कपड्यांबद्दल मर्यादा आखल्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : मी कपड्यांवरून राखीला काही गोष्टींची मर्यादा आखून दिल्याचे राखीचा बॉयफे्रंड आदिलने एका टीव्ही मुलाखतीत म्हटले आहे. आदिल आणि राखी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. त्यांच्या रिलेशनशिपविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले आहे.

दरम्यान सध्या राखीचे नवे गाणे सोशल मीडियावर आले आहे. त्याला तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये राखीच्या बॉयफे्रंडने कपड्यांबाबत राखीला सक्त ताकिद दिल्याचे कळत आहे. त्याने त्याविषयी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर वक्तव्य केल्याने तो चर्चेत आला आहे.

मी नेहमीच माझ्या कुटुंबियांचा विचार केला आहे. त्यांना काय वाटते हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. राखी जेव्हा माझ्या कुटुंबाचा भाग होईल तेव्हा मी कपड्यांवरून तिला काही गोष्टींची मर्यादा आखून दिली आहे. याचा अर्थ मी तिच्यावर कपड्यांबाबत सक्ती करतो आहे असे नाही.
हल्ली राखी बोल्ड कपड्यांमध्ये का दिसत नाही यावरून तिला एकाने प्रश्न विचारला होता.

त्यावर तिच्या बॉयफे्रंडने दिलेले उत्तर चर्चेत आले आहे. मी राखीला अद्याप हिजाब घालण्यासाठी आग्रह केलेला नाही. मात्र घरात असताना कपड्यांबाबत तिने योग्य ती काळजी घ्यावी, असे माझे म्हणणे आहे. सोशल मीडियावर या प्रेस मीटचा व्हीडीओ व्हायरल झाला असून त्यावर दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी ज्या धर्मातून आलो आहे त्याचे नियम आणि अटी याचे पालन मला केले पाहिजे. त्याचा आदर करायला हवा, असे मला वाटते. असे आदिल म्हणतो आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या