30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home मनोरंजन प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा ‘लव्ह यू मित्रा’

प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा ‘लव्ह यू मित्रा’

एकमत ऑनलाईन

मुंबई: प्रेम… प्यार… लव्ह… इष्क… भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद आहे. प्रेमाला शब्दांत सामावणं तसं कठीणच. प्रेम हे फक्त जोडीदारावरच असतं असं नाही तर कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रांवरही असू शकतं. ते कुठेही, कधीही जडू शकतं. प्रेमाची खासियत म्हणजे प्रेम हे बांधून ठेवणारं नसून ते मुक्त करणारं असतं. खरं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. तरीही अनेक जण आपल्या प्रेमभावना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात.

याच खास दिनाचे औचित्य साधून ‘मिनी फिल्म्स’ घेऊन येत आहे ‘लव्ह यू मित्रा’. हा चित्रपट आजच्या तरुणाईला भावणारा, मनोरंजक आणि नवीन विचार मांडणारा असा आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शक मानसी बागला असून वरुण बागला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिद्धार्थ साळवी यांनी लेखन केले आहे. ‘लव्ह यू मित्रा’मध्ये पूजा सावंत, गश्मीर महाजनी हे प्रमुख भूमिकेत असून आणखी एका कलाकारचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता हा तिसरा कलाकार कोण असणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘ चित्रपटात पूजा सावंत, गश्मीर महाजनी यांच्यासह एम टाऊनमधील कसलेल्या कलाकारांचा सहभाग आहे. चित्रपटाचं नाव आणि पोस्टरवरून त्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे हे नक्की. पूजा आणि गश्मिरच्या चाहत्यांसाठी ही एक अप्रतिम भेटच ठरणार आहे.

मटका चालकाकडे केली सहा लाखाची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या