19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमनोरंजनमाधुरी दीक्षितने घेतले आलिशान घर

माधुरी दीक्षितने घेतले आलिशान घर

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडची धक् धक् गर्ल माधुरी दीक्षितने मुंबईत वरळीमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. सध्या या घराबद्दल खूप चर्चा सुरू आहे. माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांनी हे घर सुपर प्रीमियम रेसिडेंशियल प्रोजेक्ट इंडियाबुल्स ब्लू येथे खरेदी केले आहे. हे घर म्हणजे अगदी स्वप्नवतच आहे. घरातून समुद्राचा नजारा दिसतो.

माधुरी दीक्षितने हे घर ४८ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. प्रति स्क्वेअर फूट या घराची किंमत ९० हजार रुपये आहे. या वर्षातला हा सर्वांत महागडा व्यवहार मानला जातोय. हा एरिया पॉश समजला जातो. इथे सगळ्या सुख-सोयी आहेत.

नव्या घराचा एरिया आणि कार पार्किंग
माधुरी दीक्षितचे हे नवे घर ५,३८४ स्क्वेअर फूट आहे. इंडियाबुल्स ब्लू या टॉवरमध्ये ५३ व्या मजल्यावर हा राजमहाल आहे. घराबरोबर सात कारसाठीचे पार्किंग आहे. याच सोसायटीत दर महिना १२ लाख रुपये भाडे देऊन माधुरी रहात होती.

हरियाणात होते माधुरीचे घर
माधुरी दीक्षितचे एक घर हरियाणात होते. २०१९ मध्ये तिने ते विकले. ते घर ३.२५ कोटी रुपयांना विकले गेले. १९९६ मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांनी मुख्यमंत्री कोट्यातून हे घर दिले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या