28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमनोरंजनमाधुरी लिजेंड..... ; कंगनाने केले माधुरीचे कौतुक

माधुरी लिजेंड….. ; कंगनाने केले माधुरीचे कौतुक

एकमत ऑनलाईन

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात असणारी कंगना स्वत:ला बॉलिवूडची क्वीन म्हणवते. परंतु ती नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत पंगा क्वीनही बनते. यापूर्वी तिने केलेल्या बेताल वक्तव्याने मोठे वादही निर्माण झाले आहेत.
आता मात्र तिने बॉलिवूडची धक्धक् गर्ल माधुरी दीक्षितचे कौतुक केले आहे. इन्स्टावर तिच्याबद्दल खास पोस्ट शेअर करून माधुरीविषयीच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

शेअर केलेल्या व्हीडीओबद्दल ती लिहिते की… रात्रीची शिफ्ट संपवून आली आहे. आणि माझ्या टाईमलाईनवर एक फोटो शेअर करते आहे. माधुरी लिजेंड….. अशा शब्दांत तिने माधुरीचे कौतुक केले आहे. कंगनाबाबत सांगायचे झाल्यास, फार कमीवेळा असे झाले आहे की, कंगनाने बॉलिवूडमधील एखाद्या सेलिब्रेटीचे मनापासून कौतुक केले आहे.

कंगनाने माधुरीच्या ‘हम आपके है कौन’ या प्रसिद्ध चित्रपटातील त्याच नावाचे थीम साँग आणि माधुरीचा फोटो शेअर केला आहे. माधुरीचं कौतुक करण्याची कंगनाची काही पहिलीच वेळ नाही. तिने यापूर्वी देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गेल्या वर्षी देखील तिने माधुरीचे ‘हम आपके है कौन’ मधील ‘दीदी तेरा देवर दीवाना’ नावाचे गाणे शेअर केले होते. त्यावर विंटेज बॉलिवूड असे म्हटले होते. कंगनाच्या त्या पोस्टवर नेटक-यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या होत्या.

दरम्यान मनोरंजन विश्व सोडून मध्येच राजकीय भूमिका घेत वेगवेगळी वक्तव्ये केल्याने कंगनाच्या चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. विशेषत: दिल्लीत शेतक-यांचे जे आंदोलन सुरू होते त्यावेळी तिने शेतक-यांचा अवमान करणारी विधाने केली होती. एका मुलाखतीत देशाच्या स्वातंत्र्यावरून केलेले वक्तव्य तर तिला चांगलेच भोवले होते. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या