मुंबई : माधुरी दीक्षित केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या सुंदरतेसाठीही नेहमीच चर्चेत असते. आपल्या प्रत्येक भूमिकेतून तिने फॅन्सना वेड लावले आहे. कोणत्याही स्टारसोबत तिची जोडी हिट होत होती.
पण अनिल कपूर आणि तिची जोडी सगळ्यात जास्त पसंत केली गेली. परंतु माधुरी अनिल कपूरच्या एका कृत्यावरून जोरजोरात ओरडू लागली होती.
अनिल आणि माधुरी ‘टोटल धमाल’ चे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले होते. यादरम्यान अनिल कपूर आणि माधुरीने त्यांच्या करिअरसंबंधी काही किस्से सांगितले होते.
‘पुकार’ सिनेमातील ‘किस्मत से तुम हमको मिले हो’ या गाण्याबद्दल त्यांनी किस्सा सांगितला होता. जेव्हा ‘पुकार’ सिनेमातील या गाण्याचे शूटिंग सुरू होते तेव्हा या गाण्याचे शूट फार थंडीत केले होते.
त्यावेळी तापमान मायनस होते. कडाक्याच्या थंडीत शूटिंगवेळी अनिल कपूर हे जॅकेट, कोट आणि मफलर घेऊन होते. पण माधुरी एका पातळ शिफॉन साडीमध्ये होती. त्यावेळी थंडीमुळे माधुरीची हालत खराब झाली होती. थंडीमुळे तिचा चेहरा निळा पडू लागला होता.
यावेळी माधुरीने सांगितले की, ‘गाण्याच्या शूटिंगवेळी फारच थंडी होती. अचानक शूटिंगवेळी हवा बंद झाली होती. मला वाटलं चला थोडा आराम मिळेल. त्यावेळी अचानक अनिल कपूर म्हणाले की, ‘हवा बंद झाल्यामुळे काही मजा येत नाहीये. चॉपरला खाली आणा, साडी उडाली नाही तर मजा येणार नाही’. मग माधुरी म्हणाली की, ती रागात तेव्हा रडू लागली होती. जोरजोरात ओरडू लागली होती. मी हे काहीच करणार नाही असेही ती म्हणाली होती.