24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमनोरंजन'महाराष्ट्र सिने आवार्ड 2021' मोठ्या उत्सहात संपन्न

‘महाराष्ट्र सिने आवार्ड 2021’ मोठ्या उत्सहात संपन्न

एकमत ऑनलाईन

जालना (प्रतिनीधी) : लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त ‘महाराष्ट्र सिने आवार्ड 2021’ मोठ्या उत्सहात संपन्न.महाराष्ट्र सिने न्युज व न्यु चैतन्य मुव्हीज् यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त अयोजीत ‘महाराष्ट्र सिने आवार्ड 2021’ मोठ्या उत्सहात जालना येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला.

या प्रसंगी महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीचे संस्थापक अध्यक्ष राजुभाई साबळे, चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे,जेष्ठ सिनेअभिनेते बाबूराव आर्दड, जेष्ठ सिनेअभिनेते मदन गायकवाड यांची प्रमुख उपस्थीती होती. कोरोनाच्या पार्श्चभुमीवर आनेक कलाकार एकमेकांपासून दूरावले व आनेकांनी फिल्म इंडस्ट्री सोडली आनेक जन खचून गेले होते, त्यांना प्रोत्सहात करण्यासाठी हा आवार्ड देवून गौरविण्यात आले.

या प्रसंगी अभिनेत्री मेघना बोरसे,अर्चना गायकवाड,मंगल पगारे,निलमनी शर्मा,अभिनेता मानस सपकाळ,गौतम शेळके,नटराज मिसाळ,नवनाथ गोडसे,वेब सिरीज मराठवाड्यातील करामती,अरुण गाडे,दिग्दर्शक महेंद्र भारसाखळे,नृत्य दिग्दर्शक सुनिल कोरके,राजू आवारे,प्रदिप वाल्सकर अदिंना पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अयोजक तथा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांनी आपल्या भाषनात बोलतांना सांगीतले की, कला हि जीवंत आहे, तीला मरु देवू नका, उदार न होता आपला अभिनय निर्भीड पने साकारा व तळागळातील कलाकारांनी एकत्रीत एऊन लढा देवूया तसेच प्रत्येक कलाकारांनी अभिनयाचे नऊ रस यांचे अभ्यास करून घ्यावे तरच आपण उत्कृष्ठ अभिनय सादर करु शकतो व यशाच्या शिखरावर जावू शकतो असेही ते या वेळे बोलले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुभाई साबळे यांनीहि आपले मनोगत मांडतांना सांगीतले की, चित्रपट क्षेत्रात काम करतांना खबरदारी बाळगावी आनेक तोतीया निर्माते चित्रपटाच्या नावाखाली तरुणींचे शाररीक शोषण करतात, तर तो खरा आहे की खोटा हे आधी पारखा व मगच काम करा, आसे कोणी केल्यास त्याला चांगलाच धडा शिकविल्या जाईल. या वेळी गोरख भारसाखळे दिग्दर्शीत व मानस सपकाळ, मेघना बोरसे अभिनीत एका हिंदी आल्बम चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी आनेक कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास वाल्मीक चांदने,अरुण गुर्हळकर,प्रविण भालेराव,सुनिता भालेराव,विनोद बोडखे,विशाल जोहरे,उमेश जाधव,प्रियंका कांबळे,सुनिता काकडे,सोनीया इंगळे,संदिप बनकर,आत्माराम मते,दिलीप घेवंदे,कैलास झीने,महेश आर्दड, व अदि कलाकार मोठ्या संख्येने उपस्थीत होते. शेवटी कार्यक्रमाला सदिच्छ भेट देण्यासाठी आला बाबूराव फेम सुरेश कांबळे यांनीही हजेरी लावली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल कोरके यांनी केले तर मंहेद्र भारसाखळे यांनी आभार प्रदर्शन केले.

पवार-शहा भेटीत सहकारावर चर्चा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या