22.3 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमहेश बाबूने घेतली बिल गेट्सची भेट

महेश बाबूने घेतली बिल गेट्सची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू सध्या पत्नी नम्रता शिरोडकरसोबत न्यूयॉर्कमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. नुकतीच या दोघांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची भेट घेतली.

महेश बाबूने या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बिल गेट्स अत्यंत नम्र आणि प्रेरणादायी असल्याचे त्याने म्हटले आहे. मे महिन्यापासून महेश बाबू त्याच्या कुटुंबीयांसोबत विविध ठिकाणी फिरायला जात आहे. मुलगी सितारा आणि मुलगा गौतम यांच्यासोबत ते आधी युरोपला फिरत होते. नंतर अमेरिकेला गेले.

आता न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये महेश आणि नम्रताची भेट बिल गेट्स यांच्याशी झाली. यावेळी दोघांनी त्यांच्यासोबतच्या फोटोची संधी सोडली नाही.

‘बिल गेट्स यांना भेटून आनंद झाला. या जगाने पाहिलेल्या महान दूरदर्शी व्यक्तींपैकी ते एक आहेत आणि तरीही ते सर्वांत नम्र आहेत. खरोखर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’, असे महेश बाबूने लिहिले. याआधी महेश बाबूने सोशल मीडियावर नम्रतासोबतचेही काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या