28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमनोरंजनमलायका-अरबाजचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मलायका-अरबाजचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान आता वेगळे झाले आहेत. असे असूनही दोघांना एकत्र ठेवणारा एक धागा आहे, तो म्हणजे त्यांचा मुलगा. होय, अरहान खान देखील एक स्टार किड म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.

अरहान हा अरबाज आणि मलायका यांचा एकुलता एक मुलगा आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अरबाजने त्याचा मुलगा अरहान खानच्या बॉलिवूड करिअरबद्दल सांगितले आहे. अरहान अमेरिकेत फिल्म मेकिंगचा कोर्स करत आहे. त्याने अलीकडेच चित्रपट निर्माता करण जोहरच्या एका चित्रपटात असिस्ट केले होते. बातम्यांनुसार, तो त्याच्या वडिलांना चित्रपट निर्मितीमध्ये मदत करेल.

अरबाज आणि मलायकाबद्दल बोलायचे झाले, तर १९९८ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाला १८ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर मे २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

त्यांचा मुलगा अरहानचा जन्म ९ नोव्हेंबर २००२ रोजी झाला. स्टारकिड अरहान खान त्याच्या आई आणि वडिलांच्या खूप जवळ आहे. मलायकासोबतही तो अनेकदा स्पॉट झाला आहे. मुलाखतीदरम्यान अरबाजने सांगितले की, त्याच्या मुलाने नुकतेच करण जोहरसोबत एका प्रोजेक्टमध्ये काम केले आहे आणि तो त्याच्या वडिलांसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटात काम करणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या