मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी जेव्हापासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, तेव्हापासून दोघेही त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. आता पुन्हा एकदा स्कॉटलंडमध्ये दोघांचे एकत्र काही रोमँटिक फोटो समोर आले आहेत.
दरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या स्कॉटलंडमध्ये एकमेकांसोबत सुटीचा आनंद घेत आहेत. दुसरीकडे, मलायकाने तिच्या ट्रीपचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोघेही फुल विंटर ड्रेसमध्ये दिसत आहेत. अर्जुन कपूरने ब्लेझर घातला असून विंटर कॅप घातली आहे. मलायका अरोरा हिने जॅकेट घातले आहे आणि तिने देखील कॅप घातली आहे आणि दोघे या सेल्फीसाठी पोज देत आहेत.
विशेष म्हणजे दोघेही त्यांच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. काही काळापूर्वी दोघेही सुटीसाठी निघाले होते. यापूर्वी दोघेही जर्मनीला गेले आणि तिथून दोघेही स्कॉटलंडला गेले.