मुंबई : बॉलिवूडमध्ये मलायकाच्या नावाची वेगळीच चर्चा सुरू असते. फिटनेस फ्रीक आणि सौंदर्यवती म्हणून तिला फॉलो करणा-यांची संख्याही मोठी आहे.
सध्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हीडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये मोदींची डुप्लिकेट असणारा एक व्यक्ती मलायकाशी संवाद साधताना दिसतो आहे. त्या व्हीडीओमध्ये मलायका आणि मोदी चर्चा करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हीडीओला नेटक-यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एरवी बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसोबत वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. खासकरून मलायकाच्या बातम्यांना तर नेटक-यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. बॉलिवूडमध्ये फिटनेस फ्रीक म्हणून मलायकाच्या फोटोंवर नेहमीच कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो. वयाची चाळीशी ओलांडून गेल्यानंतरही तिच्या सौंदर्याचे चाहते असंख्य आहेत.
तूर्तास सोशल मीडियावर त्या व्हीडीओने नेटक-यांचे मनोरंजन केले आहे. त्यावरून अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. एकाने कमेंट केली आहे की, फिटनेससंबंधी महत्त्वाची चर्चा होत आहे. दुस-याने लिहिले आहे की, ऐतिहासिक भेट आहे. बाकी काही का असेना सोशल मीडियावर त्या व्हीडीओने नेटक-यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.