23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमनोरंजनमराठमोळी चंद्रमुखी थिरकली ‘धक धक गर्ल’सोबत

मराठमोळी चंद्रमुखी थिरकली ‘धक धक गर्ल’सोबत

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘झलक दिखला जा सिझन १०’ चा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये अमृता खानविलकर माधुरी दीक्षितसोबत थिरकताना दिसत आहे. या दोघीही मराठमोळ्या अभिनेत्री आता हा शो गाजवणार हे नक्की. अमृता असलेला या शोचा पहिलाच प्रोमो प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे आता हा शो बघण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

मराठमोळी चंद्रमुखी म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर आता ‘झलक दिखला जा सिझन १०’ मध्ये आपल्या नृत्याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. टीव्हीवरचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘झलक दिखला जा सिझन १०’ चा एक प्रोमो समोर आला आहे.

त्यानुसार येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणा-या या शोमध्ये अमृता सहभागी होणार हे आता कन्फर्म झाले आहे. अमृताने आतापर्यंत तिच्या नृत्याने मराठी प्रेक्षकांना तर भुरळ घातलीच आहे पण आता ती हिंदीमध्ये नाव कमावण्यास सज्ज झाली आहे. आता ही चंद्रमुखी या शोमध्येही आपल्या नृत्याचा ठसा उमटवणार हे नक्की.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या